Gadi Lohar Samaj celebrates Shri Vishwakarma Jayanti
बार्शी विशेष : येथील गाडी लोहार समाजाच्यावतीने श्री विश्वकर्मा जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. या निमित्ताने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
श्री विश्वकर्मा जयंती दिवशी समाजबांधवांनी एकत्र येऊन श्री विश्वकर्मा भगवान यांचे विधीवत पूजन केले. त्यानंतर दादासाहेब लोहार यांचे मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक झाले. तसेच प्रा. शिवाजी पवार यांचे "पारंपरिक व्यवसायाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड" या विषयीचे व्याख्यान समाज बांधवांसाठी आयोजित करण्यात आले होते. यावेळी समाजातील ज्येष्ठ मंडळी, महिला भगिनी, मान्यवर आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात समाजाच्या प्रगतीसाठी विविध उपक्रम राबवण्याचा निर्धार करण्यात आला, तसेच युवा पिढीला लोहार समाजाच्या परंपरांचा वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन पुढे जाण्यासाठी प्रेरित करण्यात आले.
सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी समाजातील कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.