भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या जिल्हा अध्यक्षपदी विजय कोरे तर तालुका अध्यक्षपदी संगीता पवार

Admin
0

 

Vijay Kore as district president of anti-corruption committee

Vijay Kore as district president of anti-corruption committee 

बार्शी विशेष : भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या सोलापूर जिल्हा अध्यक्षपदी विजय कोरे यांची तर बार्शी तालुका अध्यक्षपदी संगीता पवार यांची निवड करण्यात आली. समितीचे जनसंपर्क अधिकारी प्रा. अनिल मुंढे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली.

अ‍ॅड. रवींद्र द्विवेदी अध्यक्ष असलेल्या भ्रष्टाचार निर्मूलन समितीची दिल्ली व मुंबई येथे प्रमुख कार्यालये असून ही समिती मागील २५ वर्षापासून कार्यरत आहे. देशभरातून लाखो लोक या समितीशी जोडले गेलेले आहेत. या समितीचा भ्रष्टाचाराविषयीचा अहवाल दरवर्षी विधिमंडळामध्ये सादर केला जातो, त्याचबरोबर संसदेमध्ये सुद्धा सादर केला जातो आणि समितीने केलेल्या शिफारशी राबविण्यासाठी सरकार प्रयत्नशील असते, अशी माहिती समितीचे जनसंपर्क अधिकारी प्रा. अनिल मुंढे यांनी दिली.

विजय कोरे हे डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष असून 'महाराष्ट्र डिजिटल न्यूज'चे संपादक आहेत, तर संगीता पवार या 'जिजाऊ टाईम्स'च्या संपादिका आहेत. या दोघांचे पत्रकारितेतील कार्य व समाजसेवेतील योगदान लक्षात घेऊन समितीकडून निवड करण्यात आली आहे. याबद्दल सर्व स्तरातून दोघांचेही अभिनंदन होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)