Gutkha worth fifty thousand seized in Barshi
बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिसांनी ५० हजार रुपये किंमतीचा प्रतिबंधित गुटखा व पानमसाल्याचा साठा जप्त केला. २ जानेवारी रोजी दुपारी साडेतीनचे सुमारास ही कारवाई करण्यात आली.
साई अंबऋषी नगर येथे सुरु असलेल्या बांधकामाशेजारील पत्राशेडमध्ये गुटख्याचा साठा असल्याची बातमी उपनिरिक्षक उमाकांत कुंजीर यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी केलेल्या कारवाईत तेथे शासनाने प्रतिबंधित केलेला गोवा १०००, केके १०००, विमल पानमसाला, बाजीराव गोल्ड, व्ही ७७ पानमसाला यांचा ४९ हजार ५० रुपये किंमतीचा साठा आढळून आला. पोलिसांनी तो साठा जप्त करुन अन्न व औषध प्रशासन विभागास याची माहिती दिली.
अन्न सुरक्षा अधिकारी नंदिनी सि. हिरेमठ रा. सोलापूर यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सुशांत जीवन गवळी (वय ३२) रा. गांधी स्टॉप, नागणे प्लॉट, परांडा रोड, बार्शी यांचेविरोधात भा.न्य.सं. कलम १२३, २७४, २७५ व २२३ नुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.