बार्शीत चोरांचा धुमाकूळ; तीन दुकानांचे शटर उचकटून केल्या चोऱ्या

Admin
0
Thieves steal from the 3 shops by lifting shutters in Barshi

Thieves steal from the 3 shops by lifting shutters in Barshi


बार्शी विशेष : शहर पोलिस ठाण्यापासून काही अंतरावरच असलेल्या दुकानांचे कुलूप तोडून, शटर उचकटून चोरी केल्याच्या तीन घटना २० जानेवारीच्या सकाळी उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली.

पहिल्या घटनेत सौरभ बालवाडे (रा. बार्शी) यांच्या शिवाजी आखाडा येथील बालवाडे इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून चोरांनी दुकानातील काउंटरच्या ड्रॉवर मधील रोख साडेतीन हजार रुपये व एक चांदीचे कॉईन असा ४ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरून नेला.

दुसऱ्या घटनेत राजकुमार भुजबळ (रा. हिरेमठ हॉस्पिटल कॅम्पस, बार्शी) यांच्या तेलगिरणी चौकातील बालवाडे इलेक्ट्रॉनिक्सच्या बाजूलाच असलेल्या विश्वनाथ मेडिसीन स्टोअर या दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून चोरांनी दुकानाच्या गल्ल्यातील ६ हजार रूपये रोख आणि दुकानातील सीसीटिव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर चोरुन नेला.

तर तिसऱ्या घटनेत मोनिल वैभव दोशी (रा. आडवा रस्ता बार्शी) यांच्या लातूर रोडवर असलेल्या आनंद ट्रेडर्स या दुकानाचे कुलूप तोडून व शटर उचकटून दुकानातील सीसीटिव्हीचा डिव्हीआर चोरुन नेला.

या तिन्ही चोरीच्या घटना सौरभ सोमनाथ बालवाडे (वय २७) रा. आनंदनगर, बार्शी यांनी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद करण्यात आल्या असून, पुढील तपास हवालदार घाडगे करत आहेत.


Thieves steal from the 3 shops by lifting shutters in Barshi


या चोरीच्या घटना २० जानेवारीच्या पहाटे घडल्या. यापैकी बालवाडे इलेक्ट्रॉनिक्स येथील चोरीचे कॅमेऱ्यात कैद झालेल्या चित्रणात पहाटे साडेचारचे सुमारास तोंड झाकलेले दोन चोर कटरच्या सहाय्याने कुलूप तोडण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. एकाच दिवशी तीन दुकानांचे कुलूप तोडून शटर उचकटून चोऱ्या झाल्यामुळे  व्यापारी वर्गात मात्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)