महिलेच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याचे मंगळसूत्र खेचून चोरटे पसार

Admin
0

 

Thieves snatch 4 tolas of gold mangalsutra from woman's neck

Thieves snatch 4 tolas of gold mangalsutra from woman's neck

बार्शी विशेष : सासू आणि नणंदेसोबत चालत घरी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील २ लाख १५ हजार रुपये किंमतीचे ४ तोळे सोन्याचे मंगळसूत्र मोटरसायकलवरुन आलेल्या दोघांनी खेचून नेले. सौ. कोमल प्रशांत कोतमिरे (वय ३१) रा. अलिपूर रोड, माऊली चौक, बार्शी यांनी शहर पोलिसात याबद्दल फिर्याद दिली आहे. ही घटना शनिवार १८ जानेवारी रोजी रात्री आठचे सुमारास घडली.

कोतमिरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सासू व नणंद यांचेसोबत त्या माऊली चौकातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपवून शनिवारी रात्री आठचे सुमारास त्यांचे घरी निघाल्या होत्या. त्यावेळी समोरच्या बाजूने मोटरसायकलवरुन पांढरा फुलशर्ट आणि निळी पँट घातेलेले दोन इसम आले. त्यापैकी पाठीमागे बसलेल्या इसमाने हात लांब करुन त्यांच्या गळ्यातील ४ तोळे सोन्याचे मंगळसूत्र खेचून घेतले. अचानक घडलेल्या प्रकारामुळे गोंधळलेल्या तिघींनी आरडाओरडा करुन त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला परंतु ते दोघेही मोटरसायकलवरुन पसार झाले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)