रिलायन्स कंपनीच्या ऑप्टीकल फायबर केबलची चोरी

Admin
0

 

Reliance Company's optical fiber cable stolen

Reliance Company's optical fiber cable stolen


बार्शी विशेष : रिलायन्स कंपनीची ऑप्टीकल फायबर केबल चोरीला गेली. १२ डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान ही घटना घडली. सदर काम करणारे गुत्तेदार नरसिंग नारायण टेकाळे (वय ४५) रा. पारुल नगर, मुरुड, ता. जि. लातूर यांनी बार्शी शहर पोलिसात याबाबत फिर्याद दिली आहे.

बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे ऑप्टीकल फायबर केबलचे काम करायचे असल्यामुळे टेकाळे यांनी त्यांच्या ओळखीचे संजय खरात यांच्या जामगाव रोडवरील कुबोटा ट्रॅक्टर शोरुमच्या बाजूच्या रिकाम्या जागेत १२ डिसेंबर २०२४ रोजी कामाचे साहित्य आणून ठेवले होते. १ जानेवारी २०२५ रोजी काम करण्यासाठी साहित्य नेण्याकरिता मित्रासह ते आले तेव्हा ठेवलेल्या ठिकाणी साहित्य दिसून आले नाही, तसेच चौकशी करुनही ठावठिकाणा लागला नाही.

त्यामुळे टेकाळे यांनी रिलायन्स कंपनीची हिरव्या रंगाची २ हजार मीटर व निळ्या रंगाची १ हजार मीटर केबल आणि जिओ कंपनीची १४०० मीटर ८एफ केबल याप्रमाणे ६० हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद दिली असून बार्शी शहर पोलिसांत अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)