बार्शी बसस्थानकातून सव्वा दोन लाखाच्या ऐवजाची चोरी

Admin
0

 

Jewellery worth Rs 2.25 lakh stolen from Barshi bus stand
Jewellery worth Rs 2.25 lakh stolen from Barshi bus stand

बार्शी विशेष : बार्शी बसस्थानकातून महिलेच्या पर्समधील सोन्याचे दागिने व रोख रक्कम मिळून २ लाख २२ हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेला. रामचंद्र जगन्नाथ भिंगारे (वय ६१) रा. तांबरी विभाग ता.जि. धाराशिव यांनी बार्शी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

१८ डिसेंबर २०२४ रोजी धाराशिव येथे जाण्यासाठी भिंगारे पत्नीसह बार्शी बसस्थानकावर आले होते. सायंकाळी ५.४५ चे सुमारास धाराशिव बसमध्ये ते दोघे बसले. स्थानकातून बस बाहेर पडल्यानंतर तिकीट काढण्यासाठी त्यांनी पत्नीकडे पैसे मागितले. तेव्हा त्यांच्या पत्नीला बॅगमधील पर्स दिसून आली नाही.

६ जानेवारी २०२५ रोजी भिंगारे यांनी दिलेल्या फिर्यादीत, १० ग्रॅम सोन्याची चेन, १० ग्रॅम सोन्याचे कानातील झुबे, २० ग्रॅम चांदीचे पैंजण व रोख २ हजार रुपये असा २ लाख २२ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरीला गेल्याचे नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)