Indian Oil builds Anganwadi in Pangaon as part of CSR
बार्शी विशेष : इंडियन ऑईल कंपनीकडून महिला व बाल कल्याण विभागासाठी सीएसआर अंतर्गत ३० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला. यात पानगांवमध्ये १२ लाख खर्चून एक नविन अंगणवाडी बांधून देण्यात आली असून उर्वरित १८ लाख निधीतून १२ अंगणवाडी केंद्रांना स्वयंपाकगृहाचे साहित्य संच, धान्याचा कोठा, सौरउर्जा संच, एलईडी टीव्ही संच, जलशुध्दीकरण संच आदी साहित्य देण्यात आले. प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे यांनी याकरिता विशेष पाठपुरावा केला होता.
---------------------------------------------
खांडवीत अंगणवाडीचे बांधकाम सुरु
वांगरवाडी, कव्हे (१), उपळाई ठों., खांडवी (५), पानगांव (७), काळेगांव (१), मानंगांव (१), इर्लेवाडी वैराग (दत्तनगर), सासुरे (१), दहिटणे (१), मुंगशी वा.(१) या अंगणवाड्यांना साहित्य वाटप करण्यात आले. खांडवी येथे अंगणवाडीसाठी नविन इमारतीचे बांधकाम सुरु आहे.
---------------------------------------------
सीएसआर काय आहे ?सीएसआर म्हणजे कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी. कंपन्यांनी समाजासाठी करायचे ऐच्छिक योगदान. भारतीय कंपनी कायदा, २०१३ कलम १३५ अंतर्गत समाविष्ट असलेल्या कंपन्यांना भारतातील सीएसआर तरतुदींचे पालन करणे अनिवार्य आहे. कंपन्यांनी मागील तीन वर्षांत झालेल्या सरासरी निव्वळ नफ्यातील किमान २ टक्के सीएसआर म्हणून प्रत्येक आर्थिक वर्षात खर्च करणे आवश्यक आहे.
---------------------------------------------
यावेळी 'बेटी बचाओ, बेटी पढाओ' प्रतिज्ञा घेऊन दोन मुलींच्या नावे वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख, इंडियन ऑईल कंपनीचे अधिकारी, विस्तार अधिकारी, पर्यवेक्षिका, सेविका आणि लाभार्थी महिला व विद्यार्थी उपस्थित होते.