बार्शी शहर पोलिसांची मद्यपी वाहनचालकांवर कारवाई

Admin
0

 

Barshi city police took action against drunk drivers

Barshi city police took action against drunk drivers


बार्शी विशेष : नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहर पोलिस ठाण्याच्यावतीने मागील दोन दिवसांपासून  नाकाबंदी व कोम्बींग ऑपरेशन मोहिम राबविण्यात आली होती. यामध्ये शहरातील लॉजेस, हॉटेल, ढाबे, पेट्रोल पंप, एटीएम व बँक यांची तपासणी करण्यात आली. तसेच बार्शी शहरातून तडीपार केलेले इसम, हिस्ट्रीशीटर व माहितगार गुन्हेगारांच्या घरी जाऊन चेकींग करण्यात आले.


नववर्ष स्वागताच्या पार्श्वभूमीवर मद्यपान करुन वाहने चालवू नयेत यासाठी नाकाबंदी लावण्यात आली होती. नाकाबंदी दरम्यान लहान मोठ्या १४३ वाहनांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये मद्यपान करुन वाहन चालविताना आढळून आलेल्या २८ तळीरामांवर मोटार वाहन अधिनियम कलम १८५ नुसार कारवाई करण्यात आली. मोटार वाहन अधिनियमाच्या इतर कलमान्वये केलेल्या १४९ कारवाईत १ लाख ५ हजार २०० रुपये इतका दंड आकारण्यात आला.


ऑपरेशन मुस्कान १३ (२०२४) विशेष मोहिमेअंतर्गत हरविलेल्या, बेपत्ता २१ व्यक्तींना शोधून त्यांच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. तसेच बालमजूरी करताना आढळून आलेल्या ७ बालकामगारांची सुटका करुन त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)