विश्वकर्मा प्रतिष्ठान आयोजित आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

Admin
0

Vishwakarma Pratishthan held health check-up camp


Vishwakarma Pratishthan held health check-up camp

बार्शी विशेष : येथील विश्वकर्मा प्रतिष्ठानच्यावतीने लोहार, गाडी-लोहार समाजातील बांधवांसाठी आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. 


या शिबिरात समाजातील अबालवृध्दांच्या अस्थी, दात, कोलेस्टेरॉल, लिव्हर, थायरॉइड, किडनी, डायबेटिस, लोह, ब्लड प्रेशर, ईसीजी आदी तपासण्या करण्यात आल्या.


आरोग्य तपासणीसाठी डॉ. शीतल बोपलकर, डॉ. कैवल्य गायकवाड, डॉ. तेजस लाड, डॉ. किरण लाड, डॉ. अभिजित साळुंखे, महालॅब्सचे युसुफ जमादार यांनी सहकार्य केले. 


शिबीर यशस्वी करण्यासाठी धनाजी सोनटक्के, आकाश लोहार, प्रतीक्षा राजेगावकर, रितेश जानराव, निकिता अडसुळे तसेच समाज बांधवानी परिश्रम घेतले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)