राजा माने यांना समर्पित जीवन गौरव पुरस्कार

Admin
0
Jeevan Gaurav Award dedicated to Raja Mane


Jeevan Gaurav Award dedicated to Raja Mane

बार्शी विशेष : जेष्ठ संपादक, माध्यम तज्ज्ञ व राजकीय विश्लेषक तथा डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांना पत्रकारितेतील योगदानाबद्दल पुणे येथील एमआयटी विश्वशांती विद्यापीठाच्यावतीने 'समर्पित जीवन गौरव' पुरस्कार जाहीर करण्यात आला. 

लोणी काळभोर येथील विश्वराज बाग येथे ४ ऑक्टोबर रोजी होत असलेल्या जागतिक विश्वशांती परिषदेत या पुरस्काराचे वितरण केले जाणार असल्याचे संयोजक एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्वनाथ कराड व भारताच्या महासंगणकाचे जनक शास्रज्ञ डॉ. विजय भटकर यांनी कळविले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)