Motorcycle stolen from Near Jawaharlal Hospital
बार्शी विशेष : जवाहरलाल हॉस्पिटलच्या पाठीमागे उभी केलेली मोटरसायकल फूड पार्सल घेऊन येईपर्यंत अर्ध्या तासात चोरीला गेली. शशीकांत सुभाष तोरणे (वय ४३) रा. गोंदील प्लॉट, उपळाई रोड, बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिसात तक्रार दिली आहे. ही घटना ३० सप्टेंबर रोजी रात्री साडेनऊ ते दहाचे दरम्यान घडली.
खाद्यपदार्थाच्या गाडीवरुन चायनीज फूडचे पार्सल आणण्यासाठी जवाहर हॉस्पिटलजवळ ते गेले होते. त्यावेळी हॉस्पिटल मागे होंडा शाईन मोटरसायकल (क्र. एमएच१३-ईएल-०९८०) उभी केली होती. पार्सल घेऊन मोटरसायकल उभी केलेल्या ठिकाणी आले त्यावेळी ती चोरीला गेल्याचे दिसून आले.