वैराग पोलिसांची धडक कारवाई; २१ जनावरांची सुटका, १७ लाखाचा मुद्देमाल जप्त

Admin
0

 

Vairag police raid operation, rescue of 21 animals, seizure of goods worth 17 lakhs

Vairag police raid operation, rescue of 21 animals, seizure of goods worth 17 lakhs

बार्शी विशेष (वैराग) : गोवंश जनावरांच्या अवैध वाहतूकीविरोधात वैराग पोलिसांनी केलेल्या धडक कारवाईत ४ वेगवेगळ्या घटनेत २१ जनावरांची सुटका करुन सुमारे १७ लाखाचा मुद्देमाल जप्त केला. 

११ ऑक्टोबरच्या रात्री साडेबारा ते सकाळी सातचे दरम्यान ही कारवाई करण्यात आली. पोहेकॉ अरुण देशपांडे, वाहन चालक पोकॉ मारकड, गृहरक्षक मस्के व खरटमल यांचे गस्तीपथक रात्रगस्त करत असताना संशयास्पद रितीने जाणारी वाहने थांबवून तपासणी केली असता, ४ वेगवेगळ्या वाहनातून गोवंशाची जनावरे दाटीवाटीने कोंबून धाराशिव जवळच्या रुईभर येथील कत्तलखान्यात कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याचे आढळून आले. 

पहिल्या कारवाईत रात्री ०.३५ वाजता शेळगाव धामणगाव मार्गावर टेंपो क्र. एमएच४३-यु-२७४७ मधून ११ जर्सी गायी त्यापैकी ३ मयत वाहतूक केल्याप्रकरणी फुरखान इरफान कुरेशी (वय २०) रा. ख्वाजानगर, गॅरेज लाईन, धाराशिव याचेविरोधात गुन्हा दाखल करुन ७ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. धाराशिव जवळच्या रुईभर येथील कत्तलखान्यात घेवून जात असल्याचे वाहनचालकाने सांगितले.

दुसऱ्या कारवाईत पहाटे ४.१५ वाजता रातंजन मालेगाव मार्गावर टेंपो क्र. एमएच२५-पी-३७१३ मधून २ जर्सी गायी वाहतूक केल्याप्रकरणी निखील नामदेव खेंदाड (वय २७) रा. खेंदाड गल्ली, वैराग याचेविरोधात गुन्हा दाखल करुन २ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची जनावरे सुनिल पवार रा. वैराग यांचे मार्फतीने धाराशिव जवळच्या रुईभर येथील कत्तलखान्यात घेऊन जात असल्याचे वाहनचालकाने सांगितले.

तिसऱ्या कारवाईत सकाळी ६.३० वाजता रातंजन फॉरेस्टजवळील उतारावर पिकअप क्र. एमएच४२-एक्यू-२९२६ मधून ४ मोठ्या जर्सी गायी व १ पांढऱ्या रंगाची देशी कालवड वाहतूक केल्याप्रकरणी बिलाल आयुब कुरेशी (वय २४) रा. पापनस, ता. माढा याचेविरोधात गुन्हा दाखल करुन ४ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची जनावरे अफसर कुरेशी, रा. धाराशिव यांचेकडे धाराशिव जवळच्या रुईभर येथील कत्तलखान्यात घेवून जात असल्याचे वाहनचालकाने सांगितले.

चौथ्या कारवाईत सकाळी ६.४० वाजता रातंजन फॉरेस्टजवळील गणपती मंदिराजवळ टेंपो क्र. एमएच१३-एएक्स-८६५३ मधून २ मोठ्या जर्सी गायी व १ लहान वासरु वाहतूक केल्याप्रकरणी पांडुरंग भारत खेंदाड (वय ४०) रा. खेंदाड गल्ली, वैराग याचेविरोधात गुन्हा दाखल करुन २ लाख ३० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सदरची जनावरे अजीम नजीर कुरेशी, रा. मोहोळ चौक, वैराग यांचेमार्फतीने धाराशिव जवळच्या रुईभर येथील कत्तलखान्यात घेवून जात असल्याचे वाहन चालकाने सांगितले.

या कारवाईत २१ गोवंशाची जनावरे आणि ४ वाहने मिळून १६ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल  जप्त केला आहे.  पोहेकॉ अरुण देशपांडे यांनी दिलेल्या ४ स्वतंत्र फिर्यादीनुसार वैराग पोलिस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)