वंचितांसाठी दिलेल्या योगदानाबद्दल सचिन वायकुळे यांचा सन्मान

Admin
0

 

Sachin Waikule honoured for his contribution to the underprivileged

Sachin Waikule honoured for his contribution to the underprivileged

बार्शी विशेष : समाजातील वंचित घटक तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क मिळवून देणे, तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांचे आरोग्य आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लेखक सचिन वायकुळे यांचा बार्शी नगरपरिषदेच्यावतीने सन्मान करण्यात आला.

यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात माजी पालकमंत्री विजकुमार देशमुख, आ. बबन अवताडे तसेच आ. राजेंद्र राऊत यांच्या हस्ते वायकुळे यांचा सन्मान करण्यात आला.

वंचितांना लोकशाहीचा अधिकार मिळावा यासाठी तृतीयपंथी व देहविक्रय करणाऱ्या महिलांना मतदान ओळखपत्र मिळवून देण्यासाठी वायकुळे यांनी पुढाकार घेतला होता. परिणामस्वरुपी बार्शी तालुक्यातील ३९ तृतीयपंथीयांचा मतदान यादीत समावेश झाला. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत यंदा प्रथमच तृतीयपंथीयांना मतदानाचा हक्क बजावता आला. राज्य निवडणूक आयोग तसेच तहसील कार्यालयाच्या सहकार्याने ही मोहीम राबविण्यात आली होती.

देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुलांना शिक्षणप्रवाहात आणणे तसेच या दोन्ही वंचितांना आधार कार्ड, रेशन कार्ड तसेच मतदान ओळखपत्र देणे यासाठी वायकुळे यांनी दिलेल्या योगदानाची दखल घेत बार्शी नगरपरिषदेने त्यांचा सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह देऊन सन्मान केला. वायकुळे यांच्यासह त्यांचे वडिल निवृत्त तहसीलदार मदनराव वायकुळे, क्रीडा शिक्षक समीर वायकुळे यांनी हा सन्मान स्विकारला.

यावेळी बार्शी नगरपरिषदेचे प्रशासक बाळासाहेब चव्हाण, तहसीलदार एफ. आर. शेख, पोलिस निरीक्षक बालाजी कुकडे आदी मान्यवर उपस्थित होते.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)