बार्शी शहरातून दोन दिवसात दोन मोटरसायकल गेल्या चोरीला

Admin
0

 

Two motorcycles were stolen in two days from Barshi city

Two motorcycles were stolen in two days from Barshi city


बार्शी विशेष : बार्शी शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे प्रकार सातत्याने सुरुच असून वेगवेगळ्या घटनेत दोन मोटरसायकल चोरीला गेल्याच्या तक्रारी बार्शी शहर पोलिस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.

पहिल्या घटनेत राहत्या घरासमोर हँडल लॉक करुन लावलेली काळ्या रंगाची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल क्र. एमएच-१३-सीझेड-२०६८ रात्रीतून चोरीला गेली. शिवाजी तानाजी पोकळे (वय ३२) रा. शिवाजी आखाडा, बार्शी यांनी याबाबतची तक्रार बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. १९ ऑक्टोबरच्या रात्री साडे अकरा ते २० ऑक्टोबरच्या सकाळी आठचे दरम्यान ही घटना घडली.

दुसऱ्या घटनेत शहरातील भाजी मंडईच्या उत्तर बाजूस लावलेली काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल क्र. एमएच१३-डीव्ही-१११४ भाजी घेऊन येईपर्यंत अवघ्या १५ मिनीटात चोरीला गेल्याची घटना घडली. सूरज धनाप्पा कोटकर (वय ३०) रा. महादेव मदिर जवळ, चोरमुले प्लॉट, बार्शी यांनी याबाबतची तक्रार बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे. २० ऑक्टोबर रोजी सकाळी सव्वानऊ ते साडेनऊचे दरम्यान ही घटना घडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)