Barshi Assembly Election 2024: On the second day, 23 persons took 36 applications
बार्शी विशेष : बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी २३ ऑक्टोबर रोजी ९ व्यक्तींनी १४ अर्ज घेतले. आत्तापर्यंत एकूण २३ व्यक्तींनी ३६ अर्ज घेतले असून एका उमेदवाराने अनामत रक्कम भरली असल्याची माहिती बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.
अर्ज घेणाऱ्यांची नावे व संख्या याप्रमाणे,
दिनांक २२/१०/२०२४ रोजी : विनोद विक्रम जाधव, रा. बार्शी यांनी स्वतःसाठी १, रविशंकर भगवंत गोदने रा. बार्शी यांनी स्वतःसाठी १, विकास कालिदास जाधव रा. कळंबवाडी, ता. बार्शी यांनी स्वतःसाठी १ आणि दिलीप गंगाधर सोपल रा. बार्शी यांचेसाठी २ , आंनद रामचंद्र काशीद रा. घाणेगांव ता. बार्शी यांनी स्वतःसाठी १, वर्षा विनोद कांबळे रा. गौडगांव, ता. बार्शी यांनी स्वतःसाठी २, मधुकर बाबुराव काळे रा. कोरेगाव ता. बार्शी यांनी स्वतःसाठी १, किशोर परमेश्वर गादेकर रा. श्रीपतपिंपरी ता. बार्शी यांनी स्वतःसाठी १, मोहसीन साबीर तांबोळी रा. बार्शी यांनी स्वतःसाठी १, किशोर आनंदाराव देशमुख रा. वैराग, ता. बार्शी यांनी स्वतःसाठी २, हर्षद हरिदास मुठाळ रा. खामगांव ता. बार्शी यांनी युवराज भाऊसाहेब काटे रा. खामगांव, ता. बार्शी यांचेसाठी ३, अरबाज इस्माईल पठाण रा. बार्शी यांनी स्वतःसाठी १ व इस्माईल मुसा पठाण रा. बार्शी यांचेसाठी १, आनंद नागनाथ यादव रा. शिवाजीनगर, बार्शी यांनी स्वतःसाठी ४ अर्ज घेतले.
दिनांक २३/१०/२०२४ रोजी : मनोज महादेव कांबळे रा. धामणगांव दु. ता. बार्शी यांनी स्वतःसाठी १, साहेबराव शहाजीराव देशमुख रा. रातंजन, ता. बार्शी यांनी स्वतःसाठी ४, सुहास तुळशीदास कांबळे रा. बार्शी यांनी स्वतःसाठी १, शोएब साबीर सय्यद रा. बार्शी यांनी स्वतःसाठी २, वसीम रमजान पठाण रा. बार्शी यांनी स्वतःसाठी २, विजयसिंह धन्यकुमार देशमुख रा. काळेगांव, ता. बार्शी यांनी स्वतःसाठी १, इलियास युसूफ शेख रा. बार्शी यांनी स्वतःसाठी १, सनी संजय गायकवाड रा. बार्शी यांनी अविनाश कोंडीबा गायकवाड रा. बार्शी यांचेसाठी १, आनंद रामचंद्र काशीद रा. घाणेगांव ता. बार्शी यांनी स्वतःसाठी १ अर्ज घेतला.