Theft of pressure pump motor from MIT College Barshi
बार्शी विशेष : बार्शीच्या एमआयटी कॉलेजमधील २ प्रेशर पंप मोटरचा सेट चोरीला गेला. कॉलेजमधील सुरक्षा रक्षक इरफान कौसर शेख (वय ३८) रा. नाईकवाडी प्लॉट, बार्शी यांनी याबद्दल शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
बार्शीतील लोकमान्य चाळ, लातूर रोड येथे असलेल्या एमआयटी कॉलेजमध्ये मागील १३ वर्षापासून सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. २९ सप्टेंबर रोजी रात्रपाळी असल्यामुळे रात्री साडेदहा वाजता चार्ज घेतला. संपूर्ण कॅम्पसमध्ये दर तासाला गस्त करुन पहाटे ३ नंतर विद्यार्थी बसचे रेकॉर्ड अद्ययावत करण्याचे काम करत गेस्ट हाऊससमोर बसलो. सकाळी ८ वाजता दिवसपाळीचे काम करणारे सुरक्षा रक्षक आल्यानंतर त्यांचेकडे चार्ज देऊन घरी गेलो.
सकाळी साडेआठचे सुमारास गेस्ट हाऊसमध्ये स्वयंपाकाचे काम करणारे खंडू चौधरी यांनी फोन करुन सांगितले की, बेसीनमध्ये पाणी येत नसल्यामुळे मोटर का बंद आहे ते बघण्यासाठी गेलो तेव्हा तेथे प्रेशर पंप मोटारीचा सेट दिसला नाही. ही गोष्ट वरिष्ठांना कळवून आम्ही सर्वांनी मिळून तेथे जाऊन शोध घेतला परंतु सेट मिळून आला नाही. त्यामुळे १ एचपी केएसबी कंपनीच्या २ प्रेशर पंप मोटारींचा सेट अज्ञात चोरट्याने चोरुन नेल्याची खात्री पटली, असे दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे.
ही घटना ३० सप्टेंबर रोजी घडली असून, १० ऑक्टोबर रोजी बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाली आहे.