Success for Digital Media: Sampadak Patrakar Sanghatna Follow-Up
बार्शी विशेष (मुंबई) : पत्रकारांसाठी महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज जाहीर केला. डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्रच्या पदाधिकारी व सदस्यांच्या पाठपुराव्याला यश मिळाल्याची भावना संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी व्यक्त केली आहे.
संघटनेच्या भिलार-महाबळेश्वर ऐतिहासिक अधिवेशनाचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेला तसेच कण्हेरीमठ-कोल्हापूर अधिवेशनाच्या समारोप प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिलेला शब्द पाळल्याबद्दल राज्यभरातील पत्रकारांतून आनंद व्यक्त होत आहे.
डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे पदाधिकारी व सदस्य राज्यातील पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी सतत पाठपुरावा करीत होते. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष प्रमुख व मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर यांनी मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पत्रकारांची बाजू मांडली.