जीन्याच्या दरवाजातून प्रवेश करुन दागिन्यांसह रोख रक्कम पळवली

Admin
0

 

Entered through the door and stole cash along with jewellery

Entered through the door and stole cash along with jewellery

बार्शी विशेष : घरातील जीन्याच्या दरवाजातून प्रवेश करुन अज्ञात चोरट्याने कपाटातून सोन्याच्या दागिन्यांसह रोख रक्कम चोरुन नेली. ही चोरीची घटना ९ ऑक्टोबरच्या पहाटे घडली. भैरवनाथ हिंदुराव पाटील (वय ४२) रा. गोंदिल प्लॉट, उपळाई रस्ता, बार्शी यांनी घटनेची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

९ तारखेच्या रात्री १ चे सुमारास पाटील व त्यांचे कुटुंबीय जेवण करुन दरवाजा आतून लावून आणि जीन्यावरील दरवाजा बंद करुन बेडरुममध्ये झोपी गेले. पहाटे साडेपाचचे सुमारास बेडरुमचा दरवाजा उघडून हॉलमध्ये आल्यानंतर हॉलमधील लोखंडी कपाट उघडे असल्याचे तसेच त्यातील सामान अस्ताव्यस्त पडल्याचे दिसले. 

कपाटात ठेवलेल्या अॅल्युमिनीयम पेटीची पाहणी केली असता, पेटीचे कुलूप तोडून त्यामधील सोन्याची १ ग्रॅमची नथ, ५ ग्रॅमची १ व अर्धा ग्रॅमची १ अशा २ सोन्याच्या अंगठ्या आणि ५०० रुपयांच्या १२ नोटा प्रमाणे ६ हजार रुपये रोख असा एकूण २५ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे दिसून आले असे फिर्यादीत नमूद केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)