So far 24 nominations have been filed for the Barshi Assembly elections
बार्शी विशेष : बार्शी विधानसभा निवडणूकीसाठी आज १३ व्यक्तींनी २८ अर्ज घेतले असून, आत्तापर्यंत एकूण ६५ व्यक्तींनी १२८ अर्ज घेतले आहेत. तसेच आज २८ ऑक्टोबर रोजी १७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले असून, आत्तापर्यंत एकूण २४ उमेदवारी अर्ज दाखल झाल्याची माहिती बार्शी तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.
२८ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्ज घेणारांची नावे व कंसात संख्या :
प्रशांत प्रमोद घोडके रा. बार्शी यांनी दिलीप गंगाधर सोपल रा. बार्शी यांचेसाठी (२), अरबाज इस्माइल पठाण रा. बार्शी यांनी इस्माइल मुसा पठाण रा. बार्शी यांचेसाठी (१), रमजान काशीम पठाण रा. बार्शी स्वतःसाठी (२), महावीर भास्करराव कदम रा. बार्शी यांनी राजेंद्र विठ्ठल राऊत रा. बार्शी यांचेसाठी (१), आनंद नागनाथ यादव रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (१), सागर मारुती बीडकर रा. मालवंडी ता. बार्शी यांनी स्वतःसाठी (१), धिरज जयचंद साबळे रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (४), प्रशांत भारत रनझुंजारे रा. बार्शी यांनी दिलीप दामोदर साठे रा. दहिटणे ता. बार्शी यांचेसाठी (४), किशोर लक्ष्मण मांजरे रा. देवगांव ता. बार्शी यांनी किरण लक्ष्मण मांजरे रा. देवगांव ता. बार्शी यांचेसाठी (१), आकिब आयुब पठाण रा. बार्शी यांनी इस्माईल उस्मान पटेल रा. वैराग ता. बार्शी यांचेसाठी (४), रणजित कल्याण पाटील रा. घाणेगांव ता. बार्शी यांनी आनंद रामचंद्र काशीद रा. घाणेगांव ता. बार्शी यांचेसाठी (२), जगदीश आनंद दगडे रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (१), अमोल आण्णासाहेब भूमकर रा. वैराग ता. बार्शी यांनी स्वतःसाठी (४) घेतले.
आज उमेदवारी अर्ज दाखल केलेल्यामध्ये राजेंद्र राऊत, दिलीप सोपल, भाऊसाहेब आंधळकर, विजय साळुंके, विनोद जाधव, युवराज काटे, धनंजय जगदाळे, साहेबराव देशमुख, किशोर गाडेकर, मनोज कांबळे, मोहसीन तांबोळी,ईस्माईल पठाण यांचा समावेश आहे