२४ ऑक्टोबर रोजी ३२ अर्ज नेले तर ३ उमेदवारी अर्ज दाखल झाले

Admin
0

 

On 24 October 32 applications were sold and 3 nominations were filed

On 24 October 32 applications were sold and 3 nominations were filed


बार्शी विशेष : बार्शी विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी २४ ऑक्टोबर रोजी १४ व्यक्तींनी ३२ अर्ज घेतले असून आत्तापर्यंत एकूण ३७ व्यक्तींनी ६८ अर्ज घेतले आहेत. तसेच मधुकर बाबुराव काळे, आनंद नागनाथ यादव, दिलीप गंगाधर सोपल यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती बार्शीचे तहसीलदार एफ. आर. शेख यांनी दिली.


दिनांक २४।१०।२०२४ रोजी अर्ज घेणारांची नावे व कंसात संख्या : 


धनंजय आनंदराव जगदाळे रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (३) व बाबासाहेब भागवत गायकवाड रा. साकत ता. बार्शी यांचेसाठी (१) असे एकूण (४), रोहित भास्करराव जगदाळे रा. बार्शी यांनी नंदकुमार नारायण जगदाळे रा. अलिपूर रोड बार्शी यांचेसाठी (२), राज संजयकुमार नानावटी रा. बार्शी यांनी बालाजी श्रीरंग डोईफोडे रा. बार्शी यांचेसाठी (१), मोहसीन साबीर तांबोळी रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (३), इब्राहिम राजअहेमद शेख रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (१) व शहाबाज जहाँगीर शेख रा. बार्शी यांचेसाठी (१) असे (२), महादेव एकनाथ काकडे रा. ढोराळे ता. बार्शी यांनी स्वतःसाठी (१), लालू दस्तगीर सौदागर रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (४), आकाश पांडुरंग दळवी रा. खांडवी ता. बार्शी यांनी स्वतःसाठी (२), अमित घन:शाम इंगोले रा. बार्शी यांनी राजेंद्र ज्ञानोबा माने रा. बार्शी यांचेसाठी (१), रणवीर राजेंद्र राऊत रा. बार्शी यांनी राजेंद्र विठ्ठल राऊत रा. बार्शी यांचेसाठी (४), संदीप अनिल मिरगणे रा. बार्शी यांनी विजय विठ्ठल राऊत रा. बार्शी यांचेसाठी (४), मोहसीन बाबू पठाण रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (२), अमोल रामेश्वर पाटील रा. देवगांव ता. बार्शी यांनी स्वतःसाठी (१) तर महेदिमीयाँ सिराज लांडगे रा. बार्शी यांनी स्वतःसाठी (१) अर्ज घेतला.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)