Barshi Assembly Election 2024: Century of Selling Nomination Papers
बार्शी विशेष : बार्शी विधानसभा निवडणूक २०२४ साठी आत्तापर्यंत एकूण ५२ व्यक्तींनी १०० अर्ज घेतले असल्यामुळे उमेदवारी अर्ज विक्रीने शंभरी गाठली. आज २५ ऑक्टोबर रोजी १५ व्यक्तींनी ३२ अर्ज घेतले आहेत. तसेच आज ३ उमेदवारी अर्ज दाखल असून आत्तापर्यंत एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले असल्याची माहिती बार्शी तहसील कार्यालयाकडून देण्यात आली.
२५ ऑक्टोबर २०२४ रोजी अर्ज घेणारांची नावे व कंसात संख्या :
अब्बास अहंमद शेख रा. वैराग, ता. बार्शी (४), गणेश पोपट शिंदे रा. बार्शी (१), किरण लक्ष्मण मांजरे रा. देवगांव ता.बार्शी (१), दीपक भाऊसाहेब आंधळकर रा. सौंदरे ता. बार्शी यांनी भाऊसाहेब रावसाहेब आंधळकर यांचेसाठी (४), प्रमोद प्रवीणकुमार घोडके रा. खांडवी ता.बार्शी (२), रामेश्वर किसन कुलकर्णी रा. उपळे दु ता. बार्शी (२), अजित भास्कर कांबळे रा. बार्शी यांनी डॉ विजय बाळकृष्ण साळुंखे यांचेसाठी (३), अनिल बबन गावसाने रा. मालवंडी ता.बार्शी (१), परमेश्वर भागवत पासले रा. यावली ता.बार्शी (१), नागनाथ दशरथ ठोंबरे रा. वैराग ता. बार्शी (३), रणजीत देविदास घावटे रा.बार्शी (१), अक्षय नागनाथ बीडबाग रा. बार्शी यांनी सुनिल सदाशिव झालटेपाटील रा. बार्शी यांचेसाठी (१), समीर मुबीन सय्यद रा. बार्शी (२), शरीफ रशीद शेख रा. वैराग ता.बार्शी (४), हरिचंद्र गोविंद लोंढे रा. बावी (आ) ता. बार्शी (१) अर्ज घेतला.