True deaf who deliberately don't listen to good things: Waykule
जागतिक कर्णबधीर दिनविशेष
बार्शी विशेष : समाजात कान असूनही जाणीवपूर्वक चांगल्या गोष्टी न ऐकणारे नि तोंड असूनही जाणीवपूर्वक न बोलणारे हेच खरे कर्णबधीर असतात, असे मत लेखक सचिन वायकुळे यांनी व्यक्त केले.
जागतिक कर्णबधिर दिनानिमित्त बार्शी येथील इंडीयन रेडक्रॉस संचलित बधिर मूक विद्यालयात टपाल तिकीट संग्राहक उदय पोतदार यांनी ४१ देशातील पोस्ट तिकीट प्रदर्शन आयोजित केले होते, त्याप्रसंगी वायकुळे बोलत होते. व्यासपीठावर संस्थेचे सचिव संतोष सूर्यवंशी, धीरज कुंकुलोळ, उदय पोतदार, सुनील फल्ले, सायरा मुल्ला, मुख्याध्यापक मुळे उपस्थित होते.
जीवनात आपल्या वाट्याला पैसा यावा, संपत्ती यावी असे प्रत्येकाला वाटते. यामुळे माणूस श्रीमंत होईल, मात्र पैशांपेक्षा जीवन समृध्द करणारे आई वडील वाट्याला यायला हवेत असे सांगून या विद्यार्थ्यांच्या कलागुणांचे वायकुळे यांनी कौतुक केले. निबंध स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिक देण्यात आले. पोतदार, मुल्ला, शिक्षक गवारे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. शिक्षिका मंजुषा काटकर यांनी प्रास्तविक केले तर मुख्याध्यापक मुळे यांनी आभार मानले.