Mangalsutra stolen with cash from woman's purse; Incident at Barshi bus stand
बार्शी विशेष : बार्शी बस स्थानकातून प्रवासी महिलेच्या पर्समधून सोन्याचे मंगळसूत्र आणि रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली. वर्षा काकासाहेब भराटे (वय ४९) रा. लातूर यांनी या घटनेची फिर्याद बार्शी शहर पोलिसात दिली आहे.
इस्पितळात दाखल असलेल्या नातेवाईकास भेटण्यासाठी फिर्यादी बार्शी येथे आल्या होत्या. भेट घेतल्यानंतर बार्शी बस स्थानकात येऊन रात्री ८ वाजता लातूर येथे जाणाऱ्या पंढरपूर हदगाव बसमध्ये त्या बसल्या. काही अंतरावर बस गेल्यानंतर तिकीट काढण्यासाठी पर्स बघितली असता पर्सची चेन उघडी दिसली. पर्समध्ये ठेवलेले सोन्याचे दोन पदक असलेले १० ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र आणि एक हजार रुपये रोख दिसून आले नाहीत. ते बसमध्ये पडले आहेत का याचाही शोध घेतला. परंतु मिळून न आल्यामुळे कुणीतरी अज्ञात चोरट्याने ते चोरल्याची त्यांची खात्री पटली.
त्यानंतर जामगांव येथे बस थांबवून फिर्याद देण्यासाठी त्यांनी थेट बार्शी शहर पोलिस ठाणे गाठले. ही घटना ६ ऑक्टोबर रोजी रात्री ८ चे सुमारास घडली.
