गहाळ मोबाईल परत मिळाल्याने तक्रारदार सुखावले

Admin
0

13 Missing mobile phones handed over to complainants by Barshi taluka police

13 Missing mobile phones handed over to complainants by Barshi taluka police

बार्शी विशेष : बार्शी तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सन २०२४ मध्ये काही मोबाईल गहाळ झाल्याबाबत तक्रारी दाखल झाल्या होत्या. तांत्रिक पध्दतीने विश्लेषण करुन त्याबाबत तपास करत असताना २ लाख २५ हजार ९८२ रुपये किंमतीचे १३ मोबाईल शोधून काढण्यात पोलिसांना यश आले. बार्शी तालुका पोलिस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे यांचे हस्ते तक्रारदारांना त्यांचे हरवलेले मोबाईल परत देण्यात आले. 

ही कामगिरी पो.अधीक्षक अतुल कुलकर्णी, अ.पो. अधीक्षक प्रितम यावलकर, उ.वि.पो. अधिकारी जालिंदर नालकूल व बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सपोनि एम. एन. जगदाळे यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकॉ उंदरे, पोकॉ लोंढे व सायबर पोलीस ठाण्याचे पोकॉ रतन जाधव यांनी केली. 

हरवलेले मोबाईल परत मिळाल्यामुळे तक्रारदारांतून समाधान व्यक्त होत आहे. मोबाईल गहाळ झाल्यास आवश्यक कागदपत्रांसह पोलीस ठाण्यात रीतसर तकार नोंदवावी असे आवाहन सपोनि एम. एन. जगदाळे यांनी केले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)