पेट्रोल उधार न दिल्याच्या रागातून तरुणाला मारहाण

Admin
0

 

A young man was beaten up out of anger for not lending petrol

A young man was beaten up out of anger for not lending petrol

बार्शी विशेष : सहा महिन्यापूर्वी पेट्रोल उधार दिले नव्हते याचा राग मनात धरुन तिघा जणांनी एका तरुणाला मारहाण केली. ही घटना ८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५ चे सुमारास कुसळंब-बार्शी रस्त्यावर घडली. अविनाश मधुकार मोरे (वय २१) रा. कुसळंब, ता. बार्शी असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरुन बार्शी तालुका पोलिस ठाण्यात महादेव उर्फ अनिकेत अनंत शिंदे, (रा. कुसळंब) सर्जेवराव किशन मोहिते व गणेश रोहिदास लोकरे (दोघे रा. काकानगर, सांजा, ता. धाराशिव) यांचेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

जामगांव येथील एका पेट्रोल पंपावर कामाला असताना सहा महिन्यापूर्वी फिर्यादीने महादेव शिंदे यांस पेट्रोल उधार दिले नव्हते त्याचा राग शिंदेच्या मनात होता. घटनेदिवशी फिर्यादी कुसळंब येथील नायरा पेट्रोल पंपावर कामावर असताना सायंकाळी ५ चे सुमारास महादेव शिंदे व त्याचे दोन मित्र मोटरसायकलवरुन तेथे आले आणि फिर्यादीस तुला लई मस्ती आलीय का म्हणून शिवीगाळी करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करु लागले. त्यावेळी महादेव शिंदेच्या हातात चाकू होता आणि दुसऱ्या एका इसमाच्या हातात कोयता होता. 

मारहाण होत असताना त्यांना ढकलून फिर्यादी टोलनाक्याच्या दिशेने पळाल्यानंतर ते तिघेजण मोटरसायकलवरुन त्याच्या मागे आले आणि तेथील एका हॉटेलच्या अलिकडे फिर्यादीस थांबवून तेथे मारहाण करु लागले. या झटपटीमध्ये शिंदेच्या हातातील चाकूने शर्ट फाटून फिर्यादीच्या छातीवर कतरता लागला. त्याचवेळी दुसऱ्या साथीदाराने कोयता उलटा करुन पाठीत मारल्यामुळे मुकामार लागला, असे फिर्यादीत म्हटले आहे.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)