बार्शी पोलिसांच्या कारवाईत दीडशे किलो गोमांस जप्त

Admin
0
150 kg beef seized in Barshi police operation

150 kg beef seized in Barshi police operation


बार्शी विशेष : ऑटोरिक्षातून विक्रीसाठी नेण्यात येत असलेले दीडशे किलो गोमांस बार्शी शहर पोलिसांनी जप्त केले. या कारवाईत पोलिसांनी रिक्षासह १ लाख २७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.  ही कारवाई ४ ऑक्टोबर रोजी सकाळी आठचे सुमारास करण्यात आली.


पोकॉ राहुल उदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, बार्शी शहर पोलिस ठाण्यात रोहन रमेश शिंदे (वय ३४), आरीफ कुरेशी आणि अली कुरेशी (सर्व रा. लक्ष्मीनगर, भूम) यांचेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी रोहन शिंदे यांस ताब्यात घेतले असून इतर दोघे फरार आहेत.


सुमित नवले व किशोर आकोसकर (दोघे रा. बार्शी) या दोघांनी गोमांस भरुन विक्री करण्यासाठी बार्शीकडे येत असलेली एक ऑटो रिक्षा (क्र. एमएच२५-एके-१०५०) पाठलाग करुन धस पिंपळगांव रोड येथील नविन गृहनिर्माण सोसायटी जवळ थांबविली. ही माहिती पोलिसांना डायल ११२ कॉलद्वारे मिळताच, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे हेकॉ पोकळे व पोकॉ राहुल उदार यांनी तेथे जाऊन चौकशी केली असता, सदर रिक्षातून काळ्या-पांढऱ्या रंगाच्या सहा पिशव्यातून सुमारे दीडशे किलो गोमांस भरुन विक्रीसाठी नेण्यात येत असल्याचे तपासणीत आढळून आले.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)