कत्तलीसाठी चालविलेल्या गोवंशाची वैराग पोलिसांनी केली सुटका

Admin
0

 

Vairag police rescued the cattle driven for slaughter

Vairag police rescued the cattle driven for slaughter


बार्शी विशेष (वैराग) : कत्तलीसाठी नेण्यात येत असलेल्या गोवंशाची पोलिसांनी सुटका करुन त्यांची गोशाळेत रवानगी केली. वैराग पोलिसात याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई २ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ चे सुमारास करण्यात आली.


एका पिकअप मध्ये गायी भरुन धाराशिव येथे कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची खबर वैराग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस निरीक्षक निवृत्ती मोरे, पोकॉ गणेश चव्हाण, उमाटे, काळे यांच्यासह धाराशिव चौक येथे गेले असता, सायंकाळी ५ चे सुमारास महिंद्रा बोलेरो पिकअप (क्र. एमएच११-टी-८९६१) तेथून भरधाव वेगात जाताना दिसला. 


त्याचा संशय आल्यामुळे पाठलाग करुन पिकअप वैराग धाराशिव रस्त्यावर थांबवून त्याची तपासणी केली त्यावेळी चार जर्सी गायी व एक लहान खोंड यांची अरुंद जागेत, वेदना होईल अशा रितीने दाटीवाटीने, चारापाण्याची व औषधाची सुविधा नसताना, अमानुषपणे कोंबून वाहतूक केली जात असल्याचे आढळून आले.


याबाबत वाहनचालकाकडे चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांनी वाहन पोलिस ठाण्यात आणून, त्यामधील गायींची सुटका करुन त्यांना सोलापूर येथील गोशाळेत पाठविले. 


पोकॉ गणेश चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, वाहनचालक इम्तियाज झाकीरहुसेन कुरेशी (वय २५) व मुस्तफा शाकीर कुरेशी (वय २०) दोघेही रा. माढा, सोलापूर या दोघांविरोधात बीएनएस, प्राण्यांचे परिवहन नियम,  पशु संरक्षण व प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)