The pickup parked near the home was stolen overnight
बार्शी विशेष : भाजीमंडई नजिकच्या राहत्या घराजवळ लावलेला पिकअप रात्रीतून चोरीला गेला. १ सप्टेंबरच्या रात्री ११.५० ते २ सप्टेंबरच्या पहाटे ६ च्या दरम्यना ही घटना घडली. याबाबत आशिष विलास चौधरी (वय ४०) रा. भोगेश्वरी चाळ, भाजी मंडईजवळ, बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.
चौधरी यांनी १ सप्टेंबर रोजी सायं. ६ चे सुमारास त्यांचा पांढऱ्या रंगाचा महिंद्र मॅक्स पिकअप (क्र. एमएच२५-पी-०६९७) भोगेश्वरी चाळ, भाजी मंडईजवळ असलेल्या राहत्या घराशेजारी रस्त्याच्या बाजूला लावला होता. त्यानंतर रात्री जेवण करुन ते झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी माल वाहतूक करण्याचे काम असल्यामुळे पहाटे ६ चे सुमारास पिकअप लावलेल्या ठिकाणी गेल्यानंतर तेथे पिकअप दिसून आला नाही. त्याबद्दल त्यांनी घरी व आसपासचे लोकांकडे चौकशी केली तसेच बार्शी शहर परिसरात व आजूबाजूच्या गावात जाऊन शोध घेतला परंतु पिकअप मिळून आला नाही.
