दहा मिनीटात मोटरसायकल गायब; बार्शीच्या भाजीमंडईतील घटना

Admin
0

A motorcycle was stolen from Barshi's vegetable market within ten minutes


 A motorcycle was stolen from Barshi's vegetable market within ten minutes

बार्शी विशेष : भाजी आणण्यासाठी मोटरसायकल उभी करुन मंडईमध्ये जाताच अवघ्या दहा मिनीटाच्या आत चोरट्याने मोटरसायकल गायब केली. बार्शीच्या भाजीमंडईत हा प्रकार घडला. 

याबाबत बाबूलाल बशीर कोतवाल (वय ४५) रा. पिंपरी (आर), ता. बार्शी यांनी शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. ही घटना २८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४.४५ ते ४.५५ च्या दरम्यान घडली.

मंडई बाहेर काळ्या रंगाची होंडा शाईन मोटरसायकल (क्र. एमएच२४-वाय-७८६२) उभी करुन मंडईत भाजी घेत असताना, कुणीतरी तुमची गाडी घेऊन जात असल्याचे त्यांच्या एका मित्राने फोन करुन सांगितले. लगेच बाहेर येऊन त्यांनी शोध घेतला परंतु मोटरसायकल मिळून आली नाही.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)