Theft of two wheeler from Bhaji Mandai area
बार्शी विशेष : भाजी आणण्यासाठी मंडईत जाताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपींग सेंटरचे पाठीमागे लावलेली मोटरसायकल (हिरो एचएफ डीलक्स क्र. एमएच-१३-डीएल-०८३१) मंडईतून भाजी घेऊन येईपर्यंत चोरीला गेली. ही घटना ५ सप्टेंबर रोजी रात्री ८.२० ते ८.५० चे दरम्यान घडली.
संजय पद्माकर कुलकर्णी (वय ४७) रा. सह्याद्री रेसीडेन्सी, गाडेगाव रस्ता, बार्शी यांनी याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
