तलवार घेऊन फिरणारा तरुण बार्शी पोलिसांच्या ताब्यात

Admin
0

Barshi Police detain a man walking with a sword in hand


Barshi Police detain a man walking with a sword in hand

बार्शी विशेष : बार्शी शहरामध्ये एक तरुण तलवार हातात घेऊन फिरत असल्याची माहिती समजताच, पोलिसांनी तेथे जाऊन त्यास तत्काळ ताब्यात घेतले. ३ सप्टेंबरच्या सायं. ७.४० चे सुमारास हा प्रकार घडला.

शहरातील वसंत बुक डेपो याठिकाणी एक इसम तलवार घेऊन फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळताच, पो. उपनिरीक्षक महेश गळगटे, हवालदार डबडे, खराडे, पोना सुरवसे, पोशि वाडकर तेथे पोहोचले. तेव्हा एक इसम तेथे हातात तलवार घेऊन उभा असल्याचे त्यांना दिसून आले. 

त्यास ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी केली असता, त्याने त्याचे नाव नागेश समाधान लंकेश्वर (वय ३०) रा. बगले बरड, सोलापूर रोड, बार्शी असल्याचे सांगून, सदरची तलवार आकाश पवार रा. गवत गल्ली, बार्शी यांची असल्याचे व आम्ही दोघे मिळून येथे आलो होतो त्यावेळी आकाशने तलवार हातात दिल्याचे सांगितले.

हवालदार बाळकृष्ण डबडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सदर दोघांविरोधात शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ नुसार बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)