ऑनलाईन फसवणूक करणारी टोळी जेरबंद; बार्शी पोलिसांची कामगिरी

Admin
0

Online fraud gang jailed; Performance of Barshi Police

Online fraud gang jailed; Performance of Barshi Police

बार्शी विशेष : मोबाईलमध्ये अॅप उघडण्यास सांगून शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवत साडेनऊ लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या टोळीला जेरबंद करण्यात बार्शी पोलिसांना यश आले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बार्शीतील डॉ. सुजित काटकर यांना मोबाईलमध्ये Mood नावाचे अॅप्लीकेशन उघडण्यास सांगून शेअर मार्केटमध्ये पैसे डबल करून देण्याचे आमिष दाखवून त्यांची साडेनऊ लाख रूपयांची फसवणूक केल्याची घटना ५ जानेवारी ते ५ फेब्रुवारी २०२४ चे दरम्यान घडली होती. त्याबाबत डॉ. काटकर यांनी बार्शी शहर पोलिसात फिर्याद दिली होती. 

सदर गुन्हयाचा तपास करताना आरोपींचे मोबाईल लोकेशन मध्यप्रदेशातील इंदोर असल्याचे निष्पन्न होताच, बार्शीचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांनी एक पोलीस पथक तातडीने इंदोरकडे रवाना केले. 

सदर पथकाने इंदोर येथून संशयीत आरोपी १) लाला उर्फ कमल नरेंद्र सोनी (वय ३५) रा. कनावटी, २) भगवानदास उर्फ विकी कन्हैयलाल आवताणी (वय ३८) रा. विकास नगर, ३) मनीष घनशाम बैरागी (वय ३०) रा. भगाणा रेल्वे स्टेशनजवळ, (सर्व रा. ता. जि. निमच, मध्यप्रदेश) यांना ताब्यात घेतले तसेच त्यांचेकडील १ लॅपटॉप, १६ मोबाईल फोन, विविध कंपन्यांचे ८६ सिमकार्ड, १५ बँकेचे चेकबुक व पासबुक आणि ८ एटीएम कार्ड जप्त केले. 

या आरोपींना बार्शी येथे आणून १० सप्टेंबर रोजी अटक करुन ११ सप्टेंबर रोजी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता, प्रमुख आरोपी क्र. १ यांस ५ दिवसांची पोलीस कोठडी तर आरोपी क्र. २ व ३ यांना न्यायालयीन कोठडी देण्यात आली. 

सदर गुन्ह्याच्या तपासात आणखी आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता असून, ऑनलाईन फसवणूक करणाऱ्या आतंरराज्यीय टोळीचा शोध घेणे सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

सदर कामगिरी जिल्हा पो.अधिक्षक अतुल कुलकर्णी, अ.पो. अधिक्षक प्रितम यावलकर, उ.वि.पो. अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली बार्शी शहर पो.नि. बालाजी कुकडे यांच्या अधिपत्याखाली सपोनि दिलीप ढेरे, सपोनि बाळासाहेब जाधव, पोउनि महेश गळगटे, पोउनि उमाकांत कुंजीर व पोहेकॉ बाळकृष्ण डबडे, पोकॉ लखन घाडगे, सचिन नितनात, गणेश अंकुशराव, धनराज फत्तेपुरे, अविरथ बरबडे तसेच सायबर पोलीस विभागाचे पोकॉ रतन जाधव यांनी पार पाडली.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)