नजिकचे मतदान केंद्र नसल्यामुळे मतदारांची अडचण

Admin
0

 

Inconvenience to voters due to remote polling station

Inconvenience to voters due to remote polling station


बार्शी विशेष : निवडणूक आयोगाने वेगवेगळे फॉर्म ऑनलाईन भरण्याची सुविधा दिल्याने मतदारांना ते सोईचे झाले असले तरी घरापासून लांब असणारे मतदान केंद्र बदलण्याचा पर्याय ऑनलाईन उपलब्ध नसल्यामुळे मात्र मतदारांची अडचण होत आहे. 


रहिवासाच्या पत्त्यामध्ये झालेला बदल अपडेट केल्यानंतर, घरापासून जवळ असणाऱ्या मतदान केंद्राऐवजी लांबचे मतदान केंद्र मिळणे, तसेच एकाच परिवारातील एका सदस्याला जवळचे आणि इतर सदस्यांना लांबचे मतदान केंद्र मिळणे असे अनुभव मतदारांना येत आहेत.


तर ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन असल्यामुळे ऑफलाईन पध्दतीने काहीच दुरुस्ती, बदल करता येत नाहीत असे स्थानिक निवडणूक शाखेतील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. यामुळे गैरसोयीचे ठरणारे मतदान केंद्र ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने बदलून घेता येत नसल्यामुळे मतदारांची चांगलीच पंचाईत झाली आहे. 


निवडणूक आयोगाने मतदारांना सोईस्कर असणारे जवळचे मतदान केंद्र बदलून घेण्याचा पर्याय ऑनलाईन किंवा ऑफलाईन पध्दतीने तातडीने उपलब्ध करुन द्यावा अशी मतदारांतून मागणी होत आहे. नाहीतर येत्या विधानसभा निवडणूकीत जवळचे सोडून लांबच्या मतदान केंद्राकडे पळण्याची वेळ मतदारांवर येणार आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)