Bell-ringing protest in Barshi
बार्शी विशेष : मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटी येथे सुरु केलेल्या आमरण उपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी आनंद काशीद यांनीही बार्शी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले असून त्याचा आज सातवा दिवस आहे.
मराठा समाजाच्या मागण्यांबाबत शासन कुठल्याही प्रकारची ठोस भूमिका घेत नसल्यामुळे, शासनाच्या डोक्यामध्ये प्रकाश पडावा यासाठी बार्शी तहसील कार्यालयासमोरील उपोषण स्थळी सोमवार २३ सप्टेंबर रोजी सरकारच्या नावानं घंटानाद आंदोलन करण्यात आले.
जर मराठा समाजाला आरक्षण दिलं नाही आणि समाजाच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर येणाऱ्या विधानसभेला सरकारला मत देण्याऐवजी मराठा समाज घंटा देईल असा इशारा उपोषणकर्ते आनंद काशीद यांनी यावेळी दिला. तर देवानं तुम्हाला चांगली बुद्धी द्यावी यासाठी हे आंदोलन सुरु आहे. समाजाच्या मागण्या मान्य केल्या तर तुमची सत्ता जाण्यापासून कोणी रोखणार नाही असे रंजीत पाटील म्हणाले.
यावेळी कृष्णा चिकणे, विक्रम बापू घाईतिडक, अविनाश मोरे, ओंकार चिकणे, पांडुरंग घोलप, मनोज मोरे यांच्यासह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
