A married woman ends life after being harassed
बार्शी विशेष : सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने, तलावात उडी घेत आपली जीवनयात्रा संपविली. बार्शी तालुक्यातील पानगांव येथे ही घटना २४ ते २५ सप्टेंबर रात्री आठ ते दुपारी एकचे दरम्यान घडली. तृप्ती सुधाकर सातपुते (वय २४) रा. पानगाव, ता. बार्शी असे मयत विवाहितेचे नांव आहे.
मयत मुलीचे वडिल बापुराव धर्मा गुंड (वय ४५) रा. सावळेश्वर, ता. मोहोळ यांनी तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार, १० ऑक्टोबर २०२२ पासून विवाहित मुलीच्या चारित्र्यावर वेळोवेळी संशय घेऊन, शिवीगाळी करून, सासरच्या मंडळींकडून तिला शारिरीक व मानसिक त्रास दिला जात होता. सासरी होणाऱ्या सततच्या त्रासामुळे कंटाळून तिने पानगांवाजवळील तलावातील पाण्यात उडी घेऊन आत्महत्या केली.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन, पती सुधाकर सोमनाथ सातपुते, सासू सुनिता सोमनाथ सातपुते, सासरा सोमनाथ सातपुते व दीर बिरू सोमनाथ सातपुते (सर्व रा. पानगाव ता. बार्शी) यांचेविरुध्द बार्शी तालुका पोलिस ठाण्यात भा.न्या.सं. कलम १०८, ८५,३५२, ११५(२), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सुधाकर सातपुते यांस अटक केली असून पुढील तपास उपनिरिक्षक भालेराव करत आहेत.