Two bike thefts in Barshi town during the day
बार्शी विशेष : बार्शी शहरातून दुचाकी चोरीला जाण्याचे सत्र सुरुच असून, भरदिवसा दुचाकी चोरीला गेल्याच्या आणखी दोन घटना घडल्या. याबाबत बार्शी शहर पोलिसांत दोन वेगवेगळ्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.
पहिल्या घटनेत, तेलगिरणी चौकातील शॉपींग कॉम्प्लेक्ससमोर लावलेली एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच-१३-बीवाय-३४८३) दुकानातून कपडे खरेदी करुन येईपर्यंत चोरीला गेली. याबाबत महादेव सोपान मस्के (वय ३४) रा. जामगांव (पा), ता. बार्शी यांनी बार्शी शहर पोलिसात तक्रार नोंदविली आहे. ही घटना १६ ऑगस्ट रोजी दुपारी पावणेचार ते साडेचारच्या दरम्यान घडली.
दुसऱ्या घटनेत, बार्शी न्यायालयासमोरील पुतळा पार्कच्या बाजूला असलेल्या पार्किंगच्या ठिकाणी सकाळी कोर्टात जाताना लावलेली हिरो स्प्लेंडर प्लस (क्र. एमएच-१३-सीझेड-२०८५) दुपारी दोनच्या सुमारास दुचाकी लावलेल्या ठिकाणी आल्यानंतर चोरीला गेल्याचे समजले, अशी तक्रार बार्शी न्यायालयात वकिली व्यवसाय करणारे अॅड. अनंत अप्पाराव मस्के (वय ४५) रा. तुळजापूर नाका, बार्शी यांनी शहर पोलिसात नोंदविली आहे. ही घटना २३ ऑगस्ट रोजी सकाळी पावणेअकरा ते दुपारी दोनचे दरम्यान घडली.
