एक गाव, एक गणपती संकल्पना राबविण्याचे बार्शी तालुका पोलिसांचे आवाहन

Admin
0

 

Appeal of Barshi Taluka Police to implement One Village, One Ganpati concept

Appeal of Barshi Taluka Police to implement One Village, One Ganpati concept

बार्शी विशेष : येत्या गणेशोत्सवात सर्व जाती, धर्म, भाषा, वंशांनी एकत्र येऊन प्रत्येक गावात एक गाव, एक गणपती ही संकल्पना राबवावी असे आवाहन बार्शी तालुका पोलिसांच्यावतीने करण्यात आले. 

बुधवार २१ ऑगस्ट रोजी बार्शी तालुका पोलीस ठाण्यात आयोजित केलेल्या बैठकीत हे आवाहन करण्यात आले. या बैठकीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य, पोलीस पाटील आणि नागरिक उपस्थित होते.

या उपक्रमामुळे गावातील एकात्मता व एकोपा अखंडित राहून गावातील सामाजिक शांतता व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होणार आहे. तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील होणारा व्यर्थ खर्च टाळून रक्तदान शिबिर, गरीब विद्यार्थ्यांना मदत असे सामाजिक उपक्रम राबवून सामाजिक बांधिलकी जपावी असे आवाहनही यावेळी करण्यात आले. 

यासाठी गाव पातळीवर शांतता कमिटी, तंटामुक्त समितीच्या बैठका घेण्यात येणार आहेत. या आवाहनास गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष व सदस्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. 

सदर बैठकीस बार्शी तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक एम. एन. जगदाळे व पोलीस उपनिरीक्षक वळसणे यांनी मार्गदर्शन केले.



टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)