CCTVs is mandatory for public Ganesh mandal : P.I. Balaji Kukde
बार्शी विशेष : सार्वजनिक गणेश मंडळांना सीसीटीव्ही लावणे बंधनकारक आहे, वर्गणी मागताना जबरदस्ती करु नका, मिरवणूकीत डीजे ऐवजी पारंपारिक वाद्यांचा वापर करावा अशा सूचना बार्शी शहर पोनि बालाजी कुकडे यांनी केल्या. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरातील गणेश मंडळासाठी आयोजित केलेल्या बैठकीप्रसंगी ते बोलत होते.
वाहतूकीला अडथळा होणार नाही अशा पध्दतीने खुले देखावे सादर करावेत, आवाजाच्या तीव्रतेचे, मर्यादेचे आणि वेळेचे बंधन पाळावे, वीज, आग यासंदर्भात काळजी घेऊन सुरक्षा उपाययोजना कराव्यात, गैरप्रकार टाळून उत्सवाचे पावित्र्य राखावे, समाज माध्यमावर पोलिसांची नजर असल्यामुळे व्यक्त होताना काळजी घ्यावी असे आवाहन त्यांनी केले.
शहर पोलिस ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस ना.तहसीलदार सुभाष बदे, सपोनि ढेरे, उपनिरिक्षक महेश गळगटे, महावितरणचे रणझुंजारे तसेच शहरातील गणेशोत्सव मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते.

