The thief kept a box of jewelry and stole only the purse of money
बार्शी विशेष : विवाहीत मुलीला भेटण्यासाठी परगावी गेलेल्या महिलेच्या घरातून चोरट्याने कपाटातील सोन्याचे दागिने ठेवलेल्या डब्याला हात न लावता, पैसे ठेवलेली पर्स मात्र चोरुन नेली. बार्शी तालुक्यातील पानगाव येथे ही घटना घडली. रुक्मीण अंकुश ताटे (वय ५०) रा. पानगांव, ता. बार्शी यांनी याबाबत तालुका पोलिसात फिर्याद दिली आहे.
त्यांना चार विवाहीत मुली असून, मोलमजूरी करुन त्या एकट्याच रहातात. पुणे जिल्ह्यातील एका विवाहीत मुलीला भेटण्यासाठी परगावी जाताना त्यांनी पर्समध्ये १५ हजार रुपये आणि स्टीलच्या डब्यात सोन्याचे दागिने घरातील कपाटाच्या लॉकरमध्ये ठेवले होते. जाताना घराला कडी कुलूप लावले होते. दरवाजाची कडी कुलूपातून निघत होती.
गावाहून परत आल्यानंतर त्यांनी घराचे कुलूप काढून कपाट उघडून पाहिले, त्यावेळी लॉकरमध्ये सोन्याचे दागिने ठेवलेला डबा तसाच दिसला, मात्र पाचशे रुपयांच्या तीस नोटा ठेवलेली पर्स दिसून आली नाही.
त्यामुळे चोरट्याने पैसे ठेवलेली पर्स चोरुन पुन्हा कडी कुलूप आहे तसे लावल्याची त्यांची खात्री झाली. ही घटना १५ ते १९ ऑगस्ट दरम्यान घडली. बार्शी तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.
