Motorcycle stolen in area near Barshi police station
बार्शी विशेष : बार्शी शहर पोलिस ठाण्यापासून जवळच असलेल्या परिसरातून राहत्या घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला गेली. संभाजी दत्तात्रय सोत्रे (वय ५७) रा. मल्लप्पा धनशेट्टी रोड, बार्शी यांनी शहर पोलिसात याची फिर्याद दिली आहे.
हिरो स्प्लेंडर प्रो मोटरसायकल (क्र. एमएच१३-बीएल-२५९५) घरासमोर लावून ते जेवण करण्यासाठी घरात गेले होते. जेवण झाल्यानंतर घरातून बाहेर येऊन पाहिले तेव्हा मोटरसायकल चोरीला गेल्याचे दिसून आले. ही घटना १३ ऑगस्ट रोजी रात्री ९ ते १० च्या दरम्यान घडली.
