उपळाईच्या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी बनविल्या जवांनासाठी राख्या

Admin
0

 

Students at Uplai made Rakhis for Indian soldiers

Students at Uplai made Rakhis for Indian soldiers


बार्शी विशेष :  'जरा याद करो कुर्बानी' या उपक्रमांतर्गत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ, बार्शी संचलित किसान कामगार विद्यालय, उपळाई (ठोंगे) प्रशालेमधील विद्यार्थ्यांनी आसामच्या गुवाहाटी सीमेवर कार्यरत असलेल्या भारतीय जवानांसाठी राख्या बनविल्या. 

बहीण भावाच्या पवित्र प्रेमाची साक्ष देणारा रक्षाबंधन सण देशभरात मोठ्या हर्षोल्हासात साजरा केला जातो, परंतु सीमेवर तैनात असलेला भारतीय जवान मात्र यावेळी आपल्या कुटुंबापासून दूर असतो, हे लक्षात घेऊन प्रशालेतील मुला-मुलींनी स्वतःचे साहित्य आणून तीन दिवसात सुमारे साडेतीनशे तिरंगी व विविध रंगांच्या सुंदर, आकर्षक राख्या तयार केल्या. 

विद्यार्थ्यांमध्ये देश प्रेमाची भावना वाढीस लागावी तसेच सीमेवर देश रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय जवांनाप्रती स्नेह, आदर व कृतज्ञता व्यक्त करण्याच्या उद्देशाने प्रशालेचे मुख्याध्यापक चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक वृंदाने हा उपक्रम राबविला.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)