स्वातंत्र्य दिनानिमित्त बार्शीतील जैन वाचनालयाकडून वाचकांना विमा सुरक्षा प्रदान

Admin
0

Jain Vachanalaya provides insurance to readers on the occasion of Independence Day


 Jain Vachanalaya provides insurance to readers on the occasion of Independence Day


बार्शी विशेष : स्वातंत्र्य दिनानिमित्त श्री वर्धमान जैन सार्वजनिक तालुका वाचनालयाच्यावतीने आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात प्रमुख अतिथी श्री जैनाश्रमचे जेष्ठ श्रावक शांतीलाल सरदारमल पुनमिया व त्यांच्या पत्नी सौ. ताराबाई पुनमिया यांनी ध्वजारोहण केले. उभयतांचा सत्कार वाचनालयाचे अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ व सौ. जयश्री सुराणा यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी श्री जैनाश्रमचे अध्यक्ष जयचंद सुराणा, जैन मंदिरचे प्रदिपभाई बागमार, वाचनालयाचे पदाधिकारी व संचालकांनी मोफत वृत्तपत्र वाचन विभागातील ३१ वाचकांना एक लाखाचे विमा सुरक्षा पत्र दिले. 

कार्यक्रमास मा. सचिव आनंद पुनमिया, अध्यक्ष किशोर श्रीश्रीमाळ, संचालक धिरज कुंकूलोळ, आनंद सुराणा, प्रमोद भंडारी, रूपेश कांकरिया, अशोक कांकरिया, श्री जैनाश्रमचे विश्वस्त भारतभाऊ कोटेचा, अध्यक्ष जयचंद सुराणा, उपाध्यक्ष चंद्रकांत कोठारी, मा. सचिव अॅड. दिनेश श्रीश्रीमाळ सर्व पदाधिकारी, संचालक व सभासद उपस्थित होते. 

वाचकांसाठी नेत्र तपासणी शिबिर घेऊन गरजूंना मोफत चष्मे देण्याचा मनोदय संचालकांनी यावेळी व्यक्त केला. प्रास्ताविक आनंद सुराणा यांनी तर सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन धिरज कुंकूलोळ यांनी केले. उपस्थितांना अल्पोपहार, चहा देऊन कार्यक्रमाची सांगता झाली.  

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथपाल सुरेश यादव, सहा. ग्रंथपाल सौ. पल्लवी तौर, लिपिक विराज पतंगे व सेविका सौ. रेखा यादव यांनी परिश्रम घेतले.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)