बार्शी बसस्थानकात चोरांचा सुळसुळाट; झोपलेल्या प्रवाशाच्या गळ्यातील चेन आणि खिशातील रक्कम लंपास

Admin
0
Chain and money stolen from passenger sleeping at Barshi bus stand


Chain and money stolen from passenger sleeping at Barshi bus stand


बार्शी विशेष : झोपलेल्या प्रवाश्याच्या गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची चेन व सहप्रवाशाच्या खिशातील ४ हजार रुपये चोरीला गेल्याचा प्रकार बार्शी बसस्थानकावर घडला. शहाजी अण्णा लटके (वय ४१) रा. राजुरी, ता. परांडा यांनी याबाबत शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.


फिर्यादीनुसार, शेतीकामासाठी ठेवलेल्या कामगाराने पलायन केल्यामुळे फिर्यादी व त्यांचे मित्र लक्ष्मण भिमराव घोरपडे (रा. घारगांव, ता. परांडा) त्याचा शोध घेत बार्शीत आले. शोध घेताना उशीर झाल्यामुळे रात्री १ चे सुमारास बार्शीच्या बसस्थानकावर ते दोघे झोपी गेले.


झोपेत असताना पहाटे ४ चे सुमारास कुणीतरी अंगाला झटत असल्याचे जाणवल्याने फिर्यादी जागे झाले, त्यावेळी एक इसम त्यांच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढताना दिसला. फिर्यादी जागे झालेले पाहून चोरट्याने गळ्यातील २ तोळे वजनाची सोन्याची चेन जोरात खेचून पळ काढला. 


मित्राला उठवून दोघांनी चोरट्याचा पाठलाग केला, परंतु तो अंधाराचा फायदा घेत पसार झाला. त्यामुळे लक्ष्मण घोरपडे यांनीही खिशातील पैसे तपासून पाहिले असता, त्यांच्याही खिशातील ५०० रुपयांच्या ८ नोटा याप्रमाणे ४ हजार रुपये चोरीला गेल्याचे दिसून आले. 


ही घटना १५ ऑगस्टच्या पहाटे ४ चे सुमारास घडली. बार्शी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा नोंद झाला आहे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)