बार्शीमध्ये संत नामदेव संजीवन समाधी सोहळा संपन्न

Admin
0

 

Sant Namdev Samadhi Sanjivan ceremony held in Barshi

Sant Namdev Samadhi Sanjivan ceremony held in Barshi


नामा म्हणे आम्ही पायरीचे चिरे । 
संत पाय हिरे देती वरी ।।


बार्शी विशेष : पांडुरंगाचे चरणी महाद्वारी समाधी घेऊन संत मंडळींचे चरणरज ललाटी मिरवण्यात धन्यता मानणारे, संत शिरोमणी श्री नामदेव महाराज व संत जनाबाई यांचा ६७४ वा संजीवन समाधी सोहळा बार्शीमध्ये भक्तीमय वातावरणात संपन्न झाला.

यानिमित्त श्री संत नामदेव मंदिरात काकडा आरती, नामदेव गाथा पारायण, हरीपाठ, चक्रीभजन, भारुड, भजन, जागर आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. 

२ ऑगस्ट रोजी दुपारी गुलालाचे कीर्तन झाल्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम झाला. सायंकाळी शहरातील प्रमुख मार्गावरुन श्रींच्या प्रतीमेची मिरवणूक काढण्यात आली होती. यावेळी समाजातील महिलांनी टाळाच्या गजरात कलाविष्कार सादर केले.

मिरवणूकीनंतर मंदिरात दहिहंडी फोडून काल्याच्या प्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली. या सोहळ्यात ह.भ.प. हरिहर सरवदे, ह.भ.प. राजेंद्र फटाले, नामदेव पुरुष व महिला भजनी मंडळांनी आपली सेवा अर्पण केली. कार्यक्रमास समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यानिमित्त मंदिरात आयोजित केलेल्या रक्तदान शिबारात ४५ रक्तदात्यांनी सहभाग नोंदवला.

सोहळ्याच्या यशस्वितेसाठी मंदिर ट्रस्ट कमिटीचे सरपंच व  माजी नगरसेवक सुनिल सरवदे, प्रा. वासुदेव मुळे, दत्तात्रय फटाले, सुनिल शंकरराव सरवदे, देवीदास सरवदे, मुकुंद ढवळे, संजय उपरे, सौ. पद्मजा सोडळ तसेच नामदेव युवक संघटनेचे अॅड. नविन सरवदे, हरी फटाले, प्रा. अतुल ढवळे, अंबादास कारंजकर, पिंटू भस्मे, अमित उपरे आदींनी परिश्रम घेतले.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)