Dense transportation of cattle; Case registered at Barshi Taluka police
बार्शी विशेष : गोवंशाची जनावरे वाहनात दाटीवाटीने भरुन कत्तलखान्याकडे नेण्यात येत असल्याचे आढळून आल्यावरुन, बार्शी तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २० जुलै २०२४ रोजी सकाळी साडेसहाचे सुमारास बार्शी कुर्डुवाडी बायपास चौक हद्दीतील मौजे अलिपूर याठिकाणी दोन इसम काळ्या रंगाची स्कार्पिओ (क्र. एमएच-०६-एएल-०२५९) मधून, १ जर्सी गाय व ८ लहान जर्सी गाईची वासरे तसेच १ म्हशीचे लहान रेडकू अशी एकूण १० जनावरे, क्षमतेपेक्षा जास्त दाटीवाटीने भरून, त्यांना वेदना होईल अशा स्थितीत व कमी रुंदीच्या जागेत, त्यांना हालचाल करता येणार नाही, अशा पध्दतीने व जनावरांच्या चारा-पाण्याची व औषधाची सुविधा नसताना दाटीवाटीने जनावरे भरून कत्तलखान्याकडे घेऊन जाताना आढळून आले.
पो. कॉ. वैभव भांगे यांनी याबाबतची फिर्याद तालुका पोलिसात दिल्यावरुन, चालक व साथीदार पैगंबर मोहम्मद हनीफ बरुरकर (वय ४०) रा. अकलूज, ता. माळशिरस व विलास गोविद ताकतोडे (वय ५३) रा. वेंकट नगर अकलूज, ता. माळशिरस यांच्याविरोधात प्राण्याचा छळ प्रतिबंधक अधिनियम कलम ११(१)(ए), ११(१)(फ ), ११(१)(एच), ११(१)(आय), ११(१) (के) प्राण्यांचे परिवहन कलम ४७. ५४. ५६, महाराष्ट्र पशुसंरक्षण कायदा १९७६ चे कलम ११. ५(ए), ५(बी) ६, ९ महाराष्ट्र पोलीस अधिनियम कायदा कलम ११९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास हेडकॉन्स्टेबल मंगरुळे करत आहेत.
