Motorcycle stolen in front of furniture shop
बार्शी विशेष : फर्निचर दुकानासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला गेली. सोमनाथ उत्तम व्हनकळस (वय ४५) रा. कसबा पेठ, बार्शी यांनी याबाबतची तक्रार शहर पोलिसात दिली आहे.
जैन मंदीर रस्ता येथील श्रीराम फर्निचर दुकानात सकाळी कामावर गेल्यानंतर व्हनकळस यांनी हिरो एचएफ डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच-१३-सीए-४३५९) दुकानच्या समोर लावली होती.
काम करुन रात्री दुकानासमोरील कट्ट्यावर ते झोपी गेले. रात्री लघुशंकेसाठी उठले त्यावेळी तेथे लावलेली मोटरसायकल चोरीला गेल्याचे लक्षात आले. ही घटना २७ जून सकाळी ८ ते २८ जून रात्री १ चे दरम्यान घडली.
