The theft of a bike from the Barshi bus stand parking lot
बार्शी विशेष : बार्शी बस स्थानकासमोरील पार्किंगमध्ये हँडल लॉक करुन लावलेली मोटरसायकल चोरीला गेली. याबाबत तोसीफ फकीरमोहम्मद तांबोळी (वय ३८) रा. बारंगुळे प्लॉट, गाडेगाव रस्ता, बार्शी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.
२३ जून रोजी सकाळी साडेसातचे सुमारास तोसीफ तांबोळी फोटोग्राफीच्या कामानिमित्त सोलापूर येथे गेले होते. त्यावेळी त्यांनी त्यांची हिरो स्प्लेंडर प्लस मोटरसायकल (क्र. एमएच-१३-बीई-१०८१) बार्शी बस स्थानकासमोरील जुन्या बंद असलेल्या पार्किंगमध्ये हँडल लॉक करुन लावली होती. सायंकाळी सहाचे सुमारास बार्शीला परत आल्यानंतर त्यांना पार्किंगमध्ये लावलेली मोटरसायकल चोरीला गेल्याचे दिसून आले.
