बार्शी नगरपरिषदेच्या टिप्परमधील बॅटऱ्या चोरीला गेल्या

Admin
0

 

Batteries stolen from Barshi Municipal Council tipper

Batteries stolen from Barshi Municipal Council tipper

बार्शी विशेष : गाडेगाव रस्त्यावरील चांदणी पाणी फिल्टर येथे लावलेल्या बार्शी नगरपरिषदेच्या टिप्परमधील बॅटऱ्या चोरीला गेल्याची घटना घडली. टिप्पर चालक मारुती अर्जुन लोंढे (वय ५५) रा. मंगळवार पेठ, उत्रेश्वर नाका, बार्शी यांनी याबाबतची फिर्याद बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

बार्शी नगरपरिषदेच्या टिप्परवर चालक म्हणून काम करणारे मारुती लोंढे यांनी २२ जून रोजी सायंकाळी ५ चे सुमारास त्यांचे ताब्यातील टिप्पर (क्र. एमएच-१३-एएक्स-२३८४) चांदणी पाणी फिल्टर गाडेगाव रस्ता येथे लावला आणि ते घरी गेले. 

२४ जून रोजी सकाळी साडेआठचे सुमारास ते कामासाठी टिप्पर नेण्यास आले असता, चावी लावूनही टिप्पर सुरु झाला नाही तसेच लाईटही लागल्या नाहीत, म्हणून बॅटरी बॉक्सकडे जाऊन पाहिले असता टिप्परमधील शाईन कंपनीच्या १२ व्होल्ट १५० अॅम्पीअरच्या दोन बॅटऱ्या चोरीस गेल्याचे त्यांना आढळून आले. 

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)