पेट्रोल पंपावरुन मोटरसायकल गेली चोरीला

Admin
0

 

A motorcycle was stolen from a petrol pump

A motorcycle was stolen from a petrol pump


बार्शी विशेष : लातूर बायपास रस्त्यावरील पेट्रोल पंपावर हँडल लॉक लाऊन ठेवलेली दुचाकी चोरीला गेली. याबाबत शंकर वामन पाटील (वय ३४) रा. व्हळे शेलगाव, ता. बार्शी यांनी शहर पोलिसात तक्रार दिली आहे.


१८ जून रोजी शंकर पाटील यांनी त्यांचेकडील हिरो एच.एफ. डिलक्स मोटरसायकल (क्र. एमएच-१३-बीझेड-२०११) लातूर बायपास रस्त्यावरील एका पेट्रोल पंपावर लाऊन ट्रकचे भाडे करण्यासाठी मुंबईला गेले होते. २२ जून रोजी सकाळी सहाचे सुमारास मुंबई येथून परत आल्यानंतर पेट्रोल पंपावर लावलेली मोटरसायकल चोरीस गेल्याचे दिसून आले.


Tags

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा (0)